जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे भुसावळ येथे तालुकास्तर वक्तृत्व स्पर्धा
भुसावळ (2 डिसेंबर 2024) : जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सदस्य एस.एस.अहिरे होते. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळचे चेअरमन संजय भालचंद्र पाटील यांनी केले. भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे यांनी स्पर्धेबाबत पाळावयाचे नियम व विशेष सूचना याबाबत मार्गदर्शन केले. एस.एस.अहिरे यांनी मार्गदर्शन केले. वक्तृत्व स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या.
असे आहेत विजयी स्पर्धक
पाचवी-सातवी या प्रथम गटात प्रथम क्रमांक गुंजन संदीप घुले (ज्ञानज्योती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, खडके) द्वितीय क्रमांक मोक्षदा किरण कचरे (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ), तृतीय क्रमांक तेजश्री सुरेश शिरसाळे (दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव), आठवी-दहावी या दुसर्या गटात प्रथम क्रमांक मीनल अजय राणे (दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव), द्वितीय क्रमांक रेणुका जितेंद्र क्षीरसागर (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ), तृतीय क्रमांक देवेश श्रीकृष्ण कंकरे (दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव) व अकरावी-बारावी या तिसर्या गटात प्रथम क्रमांक पूर्वा सचिन बेंडाळे (ज्ञानज्योती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, खडके), द्वितीय क्रमांक कोमल किशोर बोरनारे (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ), तृतीय क्रमांक रिद्धी रवींद्र बाविस्कर (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ) यांना घवघवीत यश मिळाले. सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्याध्यापक संघाच्या वतीने पेन म्हणून भेट देण्यात आला व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली. परीक्षक म्हणून राहुल केशव चौधरी, हर्षाली दिलीप गाढे, खुशबू दीपक चौधरी, हर्षा किरण जैन, गायत्री सुरज सरोदे, स्वाती रामदास महाजन, कविता मुरलीधर पाटील, निलांबरी नरेंद्र झांबरे, गोकुळ गणपतसिंग राजपूत यांनी काम पाहिले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे.पी.सपकाळे, दीपनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.बी.पाटील, श्रीकृष्ण हायस्कूल शिंदीचे मुख्याध्यापक भास्कर वारके, मांडवेदिगर हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन भालेराव, आर.जी.झांबरे विद्यालयाचे पर्यवेक्षक शशिकांत बावस्कर, सातपुडा शिक्षण संस्थेचे सदस्य जितेंद्र चौधरीख, सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी, के.नारखेडे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे उपस्थित होतेे. सूत्रसंचालन आर.जी.झांबरे विद्यालयाचे शिक्षक मनीष गुरचळ यांनी तर आभार दीपनगर शाळेचे मुख्याध्यापक जे.बी.पाटील यांनी मानले.

