65 हजार फुकट्या प्रवाशांकडून चार कोटी 18 लाखांचा दंड वसुल

नोव्हेंबर महिन्यात भुसावळ विभागाला 138.46 कोटी रुपयांचे उत्पन्न


Fines of Rs 4.18 crore collected from 65,000 casual passengers भुसावळ (5 डिसेंबर 2024) :  मध्य रेल्वेतील भुसावळ विभागाला नोव्हेंबर 2024 या महिन्यात 138.46 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात तिकीट तपासणी पथकाकडून 65 हजार प्रवाशांकडून चार कोटी 18 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी
भुसावळ विभागाने वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये नोव्हेंबर मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून चांगली कामगिरी केली आहे. यात या वित्तीय वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात प्रवासी उत्पन्न 63 कोटी 44 लाख रुपये, अन्य कोचिंगमधून आठ कोटी आठ लाख रुपये, माल परिवहन करण्यातून 65 कोटी 21 लाख रुपये, विविध विभागातील उत्पन्नातून एक कोटी 73 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. नोव्हेंबर महिन्यात मलकापूर आणि शेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट सुरू करण्यात आली. दिव्यांगजन आणि वृद्ध प्रवाशांना प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यास अधिक सोय निर्माण झाली आहे. सामान्य प्रवाशांनाही ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे.

प्रतीक्षालयाचे बांधकाम पूर्ण
मुर्तिजापूर स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रतीक्षालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रतीक्षालयामुळे प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित वातावरण मिळेल व भुसावळ मंडळात देवळाली, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, अमरावती, बर्‍हाणपूर आणि खंडवा या स्थानकांच्या पार्सल कार्यालयात ऑनलाईन क्यूआर कोड पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. भुसावळ मंडळाने डिजिटायझेशन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दिव्यांगजन ओळखपत्र देण्याचे काम सुरू केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !