भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात संशोधनाबाबत कुणाल खैरनार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान


भुसावळ (6 डिसेंबर 2024)  : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात शासकीय क्षेत्रातील विविध नामांकित संस्थांमधील विविध क्षेत्रातील संशोधनाच्या संदर्भात विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रमुख अतिथी कुणाल योगेश खैरनार यांचे नुकतेच मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

व्याख्यानाने विद्यार्थी प्रभावीत
आयआयटी, एनइएसपी, आयएटी आदी संस्थांमधील करिअर निवडीच्या दृष्टिकोनातून संशोधनाच्या संधी आणि वाटा व प्रवेश या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी बी.बी.जोगी, नितीन पाटील यांनी सुद्धा संशोधना संदर्भात आपले महत्त्वपूर्ण विचार विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे अध्यक्षस्थानी होते. सूत्रसंचालन शिक्षक एस.पी.पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन बी.बी.जोगी यांनी केले.

या व्याख्यानाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच उपयोग होईल असा विश्वास आणि आशावाद प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, हेमलता जंगले, वैशाली महाजन, सुरेश कापसे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !