गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा : पुणे-दानापूर एक्स्प्रेस वाढीव स्लीपर व जनरल कोचसह धावणार !
जळगाव (7 डिसेंबर 2024) : रेल्वेच्या जनरल डब्यांची संख्या कमी असल्यामुळे जनरल डब्यांमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही. त्यामुळे अनेकांना तिकीट काढून सुद्धा शौचालयाजवळ बसून प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे-दानापूर-पुणे रेल्वेचे स्लीपर आणि जनरल कोच वाढवण्यात आले आहे.
असे वाढले डबे
रेल्वे क्रमांक 12149/12150 पुणे-दानापूर-पुणे ही भुसावळमार्गे धावते. नवीन कोचच्या रचनेनुसार आता या रेल्वेमध्ये एकूण 23 कोच असतील. यात 2 वातानुकुलित द्वितीय श्रेणी कोच, 6 वातानुकुलित तृतीय श्रेणी कोच, 7 शयनयान श्रेणी कोच, 4 सामान्य श्रेणी कोच, 1 पेंट्री कार, 1 जनरेटर कार, 1 एसएलआरडी आणि 2 पार्सल व्हॅन असणार आहे.

समृद्धी रेल्वे रवाना
आज शेतकरी समृध्दी रेल्वे धावणार शेतकरी, व्यापार्यांचा माल परराज्यात पोहचवण्यासाठी शनिवारी दुपारी 4 वाजता जळगाव स्थानकातून शेतकरी समृद्धी रेल्वे धावणार आहे. या रेल्वेत 10 प्रवासी डबे सुध्दा असणार आहेत. त्यामुळे मालासोबत शेतकरी, व्यापार्यांना देखील प्रवास करता येणार आहे.

