थोरगव्हाणच्या डी.एस.देशमुख विद्यालयात धोंडू सखाराम देशमुख यांची जयंती उत्साहात


थोरगव्हाण, ता.रावेर (14 डिसेंबर 2024) : गावातील दि एज्युकेशन सोसायटी संचलित डी.एस.देशमुख हायस्कुलमध्ये दानशूर, अभ्यासू व्यक्तिमत्व कै.धोंडू सखाराम देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.एस.वैष्णव यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत जनार्दन चौधरी होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे, संचालक नंदकुमार चौधरी, संचालक चंद्रकांत पाटील, संचालक रवींद्र चौधरी, शाळेला नाव असलेले कै.धोंडू सखाराम देशमुख यांचे वंशज व पणतू माजी अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक चंद्रकांत गंगाधर देशमुख, सुनंदा चंद्रकांत देशमुख सपत्नीक उपस्थित होते. एम.के.पाटील यांनी चंद्रकांत देशमुख यांच्या संदेशाचे वाचन केले.

संस्थाध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात चारही दानशूर दात्यांचा व समाज सुधारकांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची माहिती देत दिलेल्या देणगीचा विद्यार्थी हितासाठी विनियोग करण्याची ग्वाही दिली. चंद्रकांत देशमुख, सुनंदा चंद्रकांत देशमुख यांनी संस्थेसाठी दहा हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली. सूत्रसंचालन वाय.जे.कुरकुरे तर जे.पी.चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.