धानोर्‍यात तरुणाची आत्महत्या तर साकळीत वृद्धाची विहिरीत उडी


यावल- दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील कोळन्हावी फाट्याजवळील आधार सोळुंके यांच्या वेफर्स विक्रीच्या शेडमध्ये प्रवीण ज्ञानेश्वर महाले (32, रा.धानोरा ता.चोपडा) यांनी बुधवारी आत्महत्या केली तर दुसर्‍या घटनेत साकळी येथील राजेंद्र लोटू ठोसरे (45) यांनी वेडाच्या भरात बसस्थानकाजवळीलत वसंत महाजन यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांप्रकरणी यावल पोलिसात नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.