रावेर गुन्हे शोध पथकाची वाळू चोरी करणार्‍यांवर कारवाई : तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त


रावेर (29 डिसेंबर 2024)  : अधिकृत परवाना नसतांना वाळू गौण खनिजाची चोरी करुन वाहतूक करणार्‍यांवर रावेर गुन्हे शोध पथकाने कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश
गौण खनिजाचे उत्खनन करुन कोणताही अधिकृत परवाना नसतांना वाळू गौण खनिजाची चोरी करुन व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने रावेर गुन्हे पथकाने वाळू अवैध करणार्‍या लक्ष केंद्रित केले. मध्यरात्री सुमारास नेहेते गावातील स्मशानभूमी जवळील रोडवर एक अनोळखी इसम हा त्याचे ताब्यातील सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा .(क्र.एम.एच.32 पी.1708) लाल रंगाचा ट्रॅक्टर व त्याला लाल रंगाची ट्रॉली विना नंबरची असलेली व त्यामधे सुमारे एक ब्रास अवैद्य वाळू भरुन स्वतच्या फायद्याकरीता लबाडीच्या इराद्याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळू चोरी करताना दिसला . पोलिसांनी कारवाई करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत एकूण वाळूची चोरी करणार्‍या तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केले आहेत. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन, सचिन घुगे, प्रमोद पाटील, महेश मोगरे, नितीन सपकाळे, चैतन्य नारखेडे यांच्या पथकाने कारवाई केली .




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !