नागपूरात भरचौकात गुंडांनी केला एकाचा खून


नागपूर : खरेदी केलेल्या आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी एका भाजी विक्रेत्याला जखमी करून त्याच्या साथीदाराचा खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री नंदनवन येथील राजेंद्रनगर चौकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी रात्री एका आरोपीस अटक केली. अक्षय करोदे रा. नंदनवन झोपडपट्टी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. मो. इमरान मो. रियाज (22) रा. हसनबाग कब्रस्तान असे मृताचे नाव आहे तर मो. आरिफ मो. सईद (25) रा. खरबी असे जखमीचे नाव आहे.


कॉपी करू नका.