केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा : अपघातांमधील जखमींवर उपचारांचे दीड लाख सरकार करणार खर्च

कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा : सात दिवसांपर्यंतचा उचलणार खर्च


नवी दिल्ली (9 जानेवारी 2025) : रस्ते अपघातांमधील जखमींवर उपचारांचे दीड लाख सरकार आठवडाभरासाठी खर्च करणार असल्याच्या कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा गुरुवारी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

काय आहेत आदेश
या योजनेनुसार अपघात झाल्यानंतर 24 तासांच्या आत रुग्णालयात दाखल होणार्‍या अपघातातील जखमींवर लागणार्‍या उपचारांच्या खर्चापैकी सुरुवातीला दीड लाख रुपये सरकारकडून रुग्णालयांमध्ये भरले जाणार आहेत. पहिल्या 7 दिवसांच्या कालावधीत लागणारा उपचाराचा खर्च या रकमेतून दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची माहिती पोलिसांकडे नोंदवली असणे आवश्यक असणार आहे. हिट अँड रन सारखी अपघाताची घटना असेल तर अशा अपघातांमधील मयताच्या वारसांना सरकारकडून दोन लाख रुपये मदत दिली जाणार आहे.

आज दिल्लीत सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाहच्या वाहतूकमंत्र्यांची बैठक झाली या बैठकीत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेची घोषणा केली वाहतूक धोरणांमध्ये सुधारणा आणि रस्ते सुरक्षा यावर चर्चेसाठी या बैठकीचे आयोजन केले होते.


कॉपी करू नका.