‘ते’ ऑपरेशन लोटस नव्हे ! आमच्या पक्षातून गेलेले 40 जण पळपुटेच ना ? खासदार संजय राऊत


“That is not ‘Operation Lotus’! The 40 individuals who left our party are nothing but deserters, aren’t they?” — MP Sanjay Raut मुंबई (26 एप्रिल 2026) : राघव चड्डा आणि त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर ईडीची रेड पडली आणि ते भाजपमध्ये पळून गेले इतकीच ती गोष्ट आहे. महाराष्ट्रातही तेच झाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत ते लोकं सुद्धा पळून गेले. हे डरपोक लोकं असतात ते अशी कारवाई झाली की पळून जातात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

ते काही ऑपरेशन लोटस नाही
खासदार राऊत आपल्या शैलीत म्हणाले की, आपचे काही ऑपरेशन लोटस झालेले नाही. सर्वच पक्षात असे पळून जाणारे लोकं असतात.आमच्याकडून 40 जण पळून गेले शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते पळपुटेच आहेत ना? शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकतात अशा लोकांना काय म्हणणार, सर्वच पक्षात असे पळपुटे लोकं असतात. संजय राऊत म्हणाले की, सरकारमध्ये मराठीच्या मुद्यावर दोन गट पडता कामानये, हे मराठी राज्य आहे, महाराष्ट्रासाठी 106 हुतात्मानी रक्त सांडले आहे.

बुआ बाबा भाजपचे प्रचारक
संजय राऊत म्हणाले की, शिवाजी महाराज थकलेले कोणी पाहिले का? त्यांच्या लढाईने औरंगजेब थकवला, अफजल खान फाडला त्यांच्याबद्दल तुम्ही हे वक्तव्य करतात हे अत्यंत चुकीचे आहे. भाजपला शिवाजी महाराज यांच्याविषयी आस्था नाही. महाराजांबद्दल अशी वक्तव्ये करणारी लोकं मुर्ख आहेत. हे सगळे बुआ बाबा भाजपचे प्रचारक आहेत. ते त्यांना बजेट देत असतात. शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे विचार तोकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिवरायांच्या इतिहासाची मोड-तोड सुरू
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सरसंघचालक यांच्या उपस्थितीमध्ये बुआ आणि महाराजांना आणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोड-तोड करण्याचे कारण काय आहे? असा सवाल राऊतांनी केला आहे. शिवरायांच्या नावाने आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते ते कधी थकले आणि झुकले नाही म्हणून महाराष्ट्र थकत नाही आणि दिल्लीपुढे झुकत नाही. हे महाराज आणतात आणि असे नवीन इतिहास लिहत आहेत, तो महाराष्ट्राला मान्य नाही. ते बुआ बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक यांनी थांबवायला पाहिजे होते.

बागेश्वर बाबांनी पहिले स्वत: मुले जन्माला घालावी
संजय राऊत म्हणाले की, बागेश्वर बाबा यांचे वय काय? अभ्यास काय? ते म्हणतात चार मुलं जन्माला घाला? त्यांनी लोकांना सल्ला देण्यापूर्वी स्वत: मुले जन्माला घालावी. तुम्ही ब्रह्मचारी अजून तुमचे लग्न झाले नाही आणि दुसर्‍यांना सांगत आहात चार मुले जन्माला घाला आणि एक मुल संघाला द्या. तुम्ही स्वत:पासून सुरवात केली पाहिजे. हे काय हिंदूत्व नाही, असेही राऊत म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !