भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीच्या तीन कर्मचार्‍यांचे मुंडण


केंद्र सरकारच्या ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरण निर्णयाचा निषेध

भुसावळ : केंद्र सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरणीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील ऑर्डनन्स फॅक्टरींतील कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. भुसावळसह वरणगाव ऑर्डनन्समधील कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या तिसर्‍या दिवशी गुरुवारी भुसावळातील फॅक्टरीबाहेर किशोर बढे, लक्ष्मण वाघ, दिनेश नेटकर या कर्मचार्‍यांनी मुंडण करून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला.

ठोस निर्णयाअभावी संप कायम
दिल्लीतील श्रम मंत्रालयात मुख्य श्रम आयुक्त, आयुध निर्माणीच्या तिन्ही फेडरेशन, सीडीआरए, आयुध निर्माणी कोलकता व संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीतही ठोस निर्णय न झाल्याने आयुध निर्माणी कर्मचार्‍यांचा नियोजीत संप कायम ठेवण्यात आला. बुधवारी दिल्लीत केंद्रीय संरक्षण उत्पादन सचिव अजय कुमार यांनी बैठक बोलावली होती मात्र बुधवारी सकाळीच ही बैठक रद्द करण्यात आली तर मुख्य श्रम आयुक्तांनी दुपारी तीन वाजता केंद्रीय श्रम मंत्रालयात अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पूर्वी झालेल्या बैठकीतील 30 हजार कोटी रुपये प्रतीवर्षी संरक्षण उत्पादन टार्गेट निर्माणींमधून देण्याचा मुद्दा उपस्थित झाला. याप्रश्नी तिन्ही फेडरेशनने 2024 पर्यंत हे टार्गेट प्रतीवर्षी पूर्ण करण्याचे यापूर्वीच सांगितले. बुधवारच्या बैठकीतून कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने आता आयुध निर्माणी कर्मचार्‍यांनी आपल्या संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


कॉपी करू नका.