जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाली आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने
नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते वाहनांचे उद्घाटन

Jalgaon District Police Force receives eight mobile forensic vehicles जळगाव (31 जानेवारी 2025) : जळगाव जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने मिळाली. त्याचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते गुरुवार, 30 रोजी पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर हिरवा झेंडा दाखवून केले.
मुंबईत झाले लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 27 जानेवारी रोजी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळा मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला होता.त्याचवेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आलेली होती.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे हे 30 रोजी जिल्हा पोलीस दलाची वार्षीक निरीक्षणासाठी जळगावी आले होते. यावेळी ते म्हणाले, गंभीर गुन्हा तपासण्यासाठी विशेषत: सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ज्ञांकडून घटनांस्थळावर त्वरीत भेट देवून फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे, विश्लेषण करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ह्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृहविभाग अंतर्गत जिल्हा पोलीस घटकातील आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी उपलब्ध असणार आहे.
या व्हॅनसोबत आवश्यक प्रशिक्षीत मनुष्यबळ, फॉरेन्सिक किट, रसायने, सॉफ्टवेअर पुरविण्यात येणार आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अंतर्गत क्राइम सोन प्लिकेशन जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेस्थळ तपासणी पुरावा संग्रहित करुन बारकोडव्दारे सुरक्षित करण्यात येईल.
या प्रसंगी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.