पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन


जळगाव (25 एप्रिल 2026) : महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिवस मुख्य शासकीय कार्यक्रम १ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्ती, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडील, तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी दि. १ मे रोजी सकाळी ७.१५ ते ९.०० या कालावधीत कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या कार्यालयांना अथवा संस्थांना स्वतंत्र ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा आहे, त्यांनी तो सकाळी ७.१५ पूर्वी किंवा सकाळी ९.०० नंतर आयोजित करावा, असे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !