मुसाळतांडा जि.प.शाळेत कोटेचा फौंडेशनतर्फे शालेय साहित्याचे वाटप
भुसावळ- स्व.प्रेमचंद रूपचंद कोटेचा फाउंडेशनतर्फे तालुक्यातील मुसाळतांडा जिल्हा परीषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. आदिवासी व डोंगराळ परीसरात राहणार्या विद्यार्थ्यांना पादत्राणे, पायजमा, खाऊचा डबा यासह शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी भुसावळ येथील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील सेवानिवृत्त माजी प्रभारी प्राचार्य प्रा.दिलीप ललवाणी यांनी शाळेला अकराशे रुपये रोख दिले.
कार्यक्रमास यांची उपस्थिती
प्रसंगी प्रशांत कोटेचा, कमलेश निकम, जे.पी.चोरडिया, प्रा.डी.एम. ललवाणी यांच्यासह शालेय समितीचे पदाधिकारी विनोद राठोड, गोरलाल राठोड, समिती सदस्य व गावातील नागरीक आणि जिल्हा परीषद शिक्षक दीपक प्रभाकर सुरवाडे व प्रवीण बाबुलाल मोरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी प्रा.ललवाणी यांनी मार्गदर्शन केले. प्रशांत कोटेचा यांनी भविष्यात सुध्दा फौंडेशनकडून मदत देण्याचे आश्वासन दिले.