भुसावळात श्री संत मुक्ताई पायी दिंडीचे फुलांच्या वर्षावात स्वागत

सामाजिक कार्यकर्ते सारंगधर पाटील यांच्या निवासस्थानी पादुकांचा अभिषेक


भुसावळ (23 फेब्रुवारी 2025) : पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथून श्री क्षेत्र मेहुण येथे निघालेल्या श्री संत मुक्ताई पायी दिंडीचे शहरातील खडका रोडवरील गुंजाळ कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते सारंगधर पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीच्या स्वागतप्रसंगी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. प्रसंगी पाटील यांच्या निवासस्थानी पादुकांचा दुग्धाभिषेक करण्यात आला तर महिलांनी फुगड्या खेळत दिंडीचे स्वागत केले. याप्रसंगी गणेश महाराज पोखरीकर यांचे ‘आईका महिमा आवडीचा’ या विषयावर कीर्तन झाले.

यांची होती उपस्थिती
पालखीतील पादुका पूजनप्रसंगी मंत्री संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अजय नागराणी, किरण कोलते, निकी बत्रा, अ‍ॅड.राय,अ‍ॅड.तुषार पाटील, गौरव आवटे, राहुल बोरसे, राहुल तायडे, गौरव वाघ, संदीप सुरवाडे, जितू माखीजा, अजय माखीजा, शंकरमल शेठ, जॉनी शेठ, प्रल्हाद पवार यांच्यासह प्रभागातील नागरिक, महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिव शक्ति महिला मंडळाने पालखी चालक सावता माहाराज यांना यावेळी 501 रुपयांची देणगी दिली. यशस्वीतेसाठी श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंगधर महादेव पाटील (छोटू भाऊ) व भाजपा युवा मोर्चा खजिनदार मनीष सारंगधर पाटील व शिवशक्ति महिला मंडळाचे सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !