लेडीज रनच्या सदिच्छादूतपदी अल्ट्रा मॅरेथॉनपटू कविता पाटील


भुसावळ (25 फेब्रुवारी 2025) : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित लेडीज रनच्या सदिच्छादूत म्हणून जळगाव येथील प्रसिद्ध धावपटू कविता पाटील यांची निवड करण्यात आली. ही स्पर्धा तीन, पाच व दहा किलोमीटर अंतरासाठी जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी 9 मार्च रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

भुसावळात नियुक्तीपत्र प्रदान
भुसावळात झालेल्या विशेष कार्यक्रमात यावर्षीच्या सहभागी प्रिती गुजर, चेतना खडसे, भारती सिंग या महिला स्पर्धकांनी कविता पाटील यांचा सत्कार केला. त्याचबरोबर असोसिएशनच्या वतीने डॉ.चारुलता पाटील यांनी सदिच्छादूत नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी सर्व महिलांनी मोठा जल्लोष केला. याप्रसंगी जळगाव रनर्स ग्रुपच्या महिला धावपटू व माजी सदिच्छादूत विद्या बेंडाळे व डॉ.रती महाजन देखील उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. यावेळी असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक, प्रवीण वारके, गणसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी पंकज कुलकर्णी, छोटू गवळी, स्वाती फालक, किर्ती मोतळकर, पूनम कुलकर्णी, रीना परदेशी, डॉ.वर्षा वाडीले, पारुल वर्मा, मनीषा सिंग, गरिमा न्याती, नीलांबरी शिंदे यांनी सहकार्य केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !