भुसावळला रविवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी
भुसावळ- महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 17 वी 19 वर्षाच्या आतील मुला-मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा दोंडाईचा येथे 13 ते 15 सप्टेंबर 2019 दरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, 25 रोजी दुपारी 12 वाजता ऑर्डनन्स फॅक्टरी (ईगल) मैदान, पीओएच वर्कशॉपच्या मागे भुसावळ येेत होत आहे. 1 ऑक्टोबर 2000 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटनेचे अध्यक्ष प्रा.आमदार चंद्रकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, संघटनेचे उपाध्यक्ष शकील पटेल, डॉ.प्रदीप तळवलकर, प्रा.संजय चौधरी, निना कटलर, रमण भोळे, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, खुशाल देशमुख, प्रा आसिफ खान, गोपाल जोनवाल, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, चेतन वानखेडे, तारीख अहमद यांनी केले आहे.