अट्टल गुन्हेगार बाबा काल्या जिल्हा कारागृहात
भुसावळ : दरोड्याच्या गुन्ह्यातील कुविख्यात गुन्हेगार आसीफ बेग (बाबा काल्या) असलम बेग यास बुधवारी चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून अटक केल्यानंतर त्यास भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आरोपीस गुरुवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास जिल्हा कारागृहात हलवण्याचे आदेश देण्यात आहे. शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात आरोपीला जळगाव कारागृहात हलवल्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सांगितले.