बँकेची तिजोरी कापताना गॅस कटरचा स्फोट : चोरटे चारचाकी सोडून पसार

वैजापूर (21 एप्रिल 2025) : वैजापूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडली मात्र तिजोरी कापताना गॅस कटरचा स्फोट झाल्याने चोरट्यांनी रिकाम्या होती परतावे लागले तर घटनास्थळावरून चोरट्यांची चारचाकी जप्त करण्यात आली. रविवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला.
स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांनी आपली स्विफ्ट (एम.एच.14 बी.एक्स.7988) कार बँकेबाहेर सोडून पळ काढला.सुदैवाने या घटनेत स्ट्राँगरूममधील साडेचार लाख रुपये आणि दागिने सुरक्षित राहिले, अशी माहिती बँक व्यवस्थापक बजरंगलाल ढाका यांनी दिली.
घटनेनंतर बँकेपासून काही अंतरावर 2 ते 3 जणपळताना दिसून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलागकरण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरात महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे शटर वाकवून आत प्रवेश केला.
यावेळी गॅस कटरचास्फोट झाल्याने बॅँकेला आग लागली. स्फोटाच्याआवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी बँकेकडे धाव घेतली असता बॅँकेला आग लागलेलीहोती. बँकेपासून काही अंतरावरच पोलिस ठाणे आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या बंबाला पाचारण केले होते.
