भुसावळ भाजपाच्या शहराध्यक्षपदी किरण कोलते व संदीप सुरवाडे
ग्रामीण तालुकाध्यक्षपदी प्रशांत पाटलांसह गोलू पाटलांची निवड

Kiran Kolte and Sandeep Surwade elected as Bhusawal BJP city presidents भुसावळ (21 एप्रिल 2025) : भुसावळ शहर भाजपा शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सुरभी नगरातील मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात पदाधिकार्यांची बैठक झाली. पदाधिकारी निवडीसाठी 15 दिवसांपूर्वी ज्येष्ठांकडून प्रदेश कार्यालयाने बंद लिफाफ्यात नावे मागितली होती. भाजपाचे संघटन वाढवण्यासाठी 45 वर्षाआतील पदाधिकार्यांची यावेळी निवड जाहीर करण्यात आली. त्यात भुसावळ शहराध्यक्षपदी निष्ठावंत कार्यकर्ते संदीप सुरवाडे व किरण कोलते तर ग्रामीण तालुकाध्यक्षपदी प्रशांत पाटील व गोलू पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रमुख नवलसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
45 वर्षाआतील तरुणांना संधी
भारतीय जनता पार्टीचे या आधी दोन मंडल अस्तित्वात होते मात्र काही संघटनात्मक बदल यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यात शहरांमध्ये भुसावळ दक्षिण व भुसावल उत्तर त्याचप्रमाणे ग्रामीणमध्ये भुसावळ पूर्व व भुसावळ पश्चिम या प्रकारचे मंडळ तयार करण्यात आले. यावेळी भुसावळ पूर्वचे तालुकाध्यक्ष म्हणून प्रशांत प्रभाकर पाटील तर भुसावळ पश्चिमसाठी मुरलीधर वना पाटील तसेच भुसावळ शहर दक्षिणसाठी शहराध्यक्षपदी म्हणू किरण कोलते तर व भुसावळ उत्तरसाठी संदीप सुरवाडे यांची निवड जाहीर करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदेशच्या महिला उपाध्यक्ष केतकी पाटील, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, उपाध्यक्ष सतीश सपकाळे, सुनील काळे, दूध संघाच्या संचालिका शामल झांबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके, शेतकी संघाचे सभापती ज्ञानदेव झोपे, शहराध्यक्ष युवराज लोणारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
