भुसावळात शंभूगाथा व्याख्यान मालेचे पोस्टर रिलीज


Poster of Shambhu Gatha lecture series released in Bhusawal भुसावळ (21 एप्रिल 2025) : भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमिताने आयोजित शंभूगाथा व्याख्यान मालेचे पोस्टर रिलीज शहरातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान श्री परशुराम यांच्या फोटोला माल्यार्पण करीत व दीप प्रज्वलित करण्यात आला.

प्रसंगी शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.नितीन दावलभक्त, डॉ.सुषमा खानापूरकर, व्यापारी महासंघाचे राधेश्याम लाहोटी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, अग्रवाल समाज अध्यक्ष संजय अग्रवाल, जैन समाजाचे अन्नत्यागी रमेश भोरगाव, लेवा पंचायतीच्या मंगला पाटील, प्रा.सुनील नेवे, मराठा समाजाचे मुकेश गुंजाळ, विशाल शाह, श्री परशुराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व भुसावळकरांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !