उन्हाळी गर्दीसाठी मदुराई आणि चेन्नईहून भगत की कोठीसाठी दोन विशेष रेल्वे गाड्या


Two special trains from Madurai and Chennai to Bhagat Ki Kothi for summer rush भुसावळ (21 एप्रिल 2025) : उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मदुराई आणि चेन्नई सेंट्रल येथून भगत की कोठी (राजस्थान) या दरम्यान दोन विशेष साप्ताहिक गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांना भुसावळ, जळगावसह राज्यातील अनेक प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांचा प्रवाशांना लाभ होणार आहे.

असे आहे गाड्यांचे वेळापत्रक
मदुराई-भगत की कोठी विशेष गाडी 06067 सोमवार, 21 एप्रिल रोजी 10.45 वाजता मदुराई येथून सुटली असून ती बुधवार, 23 एप्रिल रोजी 12.30 वाजता भगत की कोठी येथे पोहोचणार आहे. गाडी क्र. 06068: गुरुवार, 24 एप्रिल रोजी 5.30 वाजता भगत की कोठी येथून सुटेल आणि शनिवार, 26 एप्रिल रोजी 8.30 वाजता मदुराई येथे पोहोचेल. ही गाडी दिंडीगूल, तिरुचिरापल्ली, वृद्धाचलम, विल्लूपुरम, चेन्नई एग्मोर, गुडूर, विजयवाडा, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, साबरमती, मेहसाणा, पाटण, जालोर, समदरी, लुनी येथे थांबणार आहे.

चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी विशेष गाडी विशेष गाडी धावणार आहे गाडी 06057 रविवार, 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.45 वाजता चेन्नई सेंट्रल येथून सुटेल व मंगळवार, 22 एप्रिल रोजी 12.30 वाजता गत की कोठी येथे पोहोचेल. गाडी 06058 बुधवार, 23 एप्रिल रोजी सकाळी 5.30 वाजता भगत की कोठी येथून सुटेल आणि शुक्रवार, 25 एप्रिल रोजी रात्री 11.15 वाजता चेन्नई सेंट्रल येथे पोहोचेल. ही गाडी सुल्लुरुपेटा, गुडूर, विजयवाडा, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, आनंद, साबरमती, पाटण, भिलडी, समदरी, लुनी येथे थांबणार आहे प्रवाशानी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलेआहे. या विशेष गाड्यांमुळे दक्षिण भारत आणि राजस्थान दरम्यानचा प्रवास सुलभ होणार आहे शिवाय उन्हाळी गर्दीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !