जळगावात मित्राच्या वाढदिवसाला आलेल्या तरुणावर गोळीबार
घरात शिरल्याने तरुण बचावला : शहरात गुन्हेगारी बोकाळली

Shots fired at a young man who came to his friend’s birthday party in Jalgaon न्युज नेटवर्क । जळगाव (25 एप्रिल 2025) : जुना वाद उफाळून आल्यानंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमास आलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. ही घटना जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स जवळ गुरुवारी रात्री 10 वाजता घडली. या घटनेतील तरुण घरात शिरल्याने सुदैवाने बचावला असून या घटनेने शहरातील गुन्हेगारी पुन्हा समोर आली आहे. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (25, प्रबुद्ध नगर, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
काय घडले जळगावात
महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे हा तरुण मित्र सचिन चौधरीच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स येथे आल्यानंतर त्या ठिकाणी चार ते पाच संशयीत आले व त्यांनी महेंद्र व सचिन यांना मारहाण केली.
हा वाद सुरू असताना एका संशयीताने गोळी झाडल्याने ती महेंद्रच्या कमरेखाली लागल्याने पळापळ सुरू झाली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.
घरात शिरल्याने बचावला तरुण
वादानंतर हल्लेखोरांनी महेंद्रच्या दिशेने गोळीबार गेल्यानंतर गोळीबारातून बचावण्यासाठी महेंद्र सैरावैरा धावत सुटला. त्यात त्याच्या मांडीवर गोळी लागली. त्यानंतर तो परिसरातील एका घरात घुसला आणि मधून दरवाजा बंद करून घेतला त्यामुळे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. महेंद्रने घरात आश्रय घेतल्यामुळे त्याच्या जीव वाचल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, रामानंद नगर आणि जिल्हापेठ पोलिसांनी जखमीची विचारपूस करत चौकशी केली. जखमी महेंद्र सपकाळे याने हल्लेखोरांची नावे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
