रावेरात ईस्लामी अतिरेक्यांचा पुतळा जाळला


Effigy of Islamic extremists burned in Rawer रावेर (25 एप्रिल 2025) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटनाला आलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ रावेरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अतिरेक्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

अतिरेक्यांच्या निषेधार्थ घोषणा
अभाविप रावेर शहर उपाध्यक्ष प्रा.शिरीष पाटील, प्रदेश संयोजक सोशल मिडिया, जिल्हा सहसंयोजक अभिषेक महाजन, शहर सहमंत्री हेमंत पाटील, कार्यक्रम प्रमुख लोकेश बारी, महाविद्यालय अध्यक्ष युवराज रायपूरकर, साई चौधरी, हेमंत कोष्टी, रोहन चौधरी, ललित बारी, रमण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत निषेध केला. दहशतवादी कृत्याबद्दल अतिरेक्याच्या पुतळ्याचे दहन करून अतिरेक्यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा : अभाविप
हत्याकांडातील दोषींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, जम्मू आणि काश्मीरमधील निर्दोष नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी, केंद्र सरकारने या घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल व समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करणार्‍या कट्टरपंथी विचारांचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी यावेळी अभाविपतर्फे यावेळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
अ‍ॅड.भास्कर निळे, भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष अ‍ॅड.सूर्यकांत देशमुख, रवींद्र पाटील, सी.एस.पाटील, भास्कर महाजन, शैलेंद्र अग्रवाल, अभिजीत लोणारी, ई.जे.महाजन, नितीन पाटील, रवींद्र महाजन, जितेंद्र गवळी, अरुण शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !