यावलला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Demand for resignation of Union Home Minister Yaval यावल (25 एप्रिल 2025) : यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देत हल्ल्याचा निषेध करण्यात आला. हल्ल्यात मृत झालेल्या भारतीय व विदेशी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील खोर्यात आतंकवादी आपल्या जवानांवर, नागरिकांवर हल्ले करत असून ते शहीद होत आहे. हे हल्ले थांबवण्यात केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा तसेच केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून अतिरेक्यांचा बिमोड करावा आणि पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
निवेदन देताना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शरद कोळी, संतोष धोबी, पप्पू जोशी, सुनील बारी, योगेश चौधरी, योगेश राजपूत पाटील, प्रवीण लोणारी, सारंग बेहेडे, विनोद कोळी, हुसेन तडवी, विजू कुंभार, पिंटू कुंभार, सागर बोरसे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
