अनिल थत्तेंना कोर्टाचा दणका : मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामीचे व्हिडीओ हटवण्याचे निर्देश


Court slaps Anil Thatte : Instructions to delete defamatory video of Minister Girish Mahajanमुंबई (12 मे 2025) : राज्याचे भाजपाचे लोकप्रिय नेते व जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची बदनामी करणारे व्हिडीओ हटवावेत असे स्पष्ट निर्देश कथित पत्रकार अनिल थत्ते यांना न्यायालयाने दिले आहेत. यामुळे गिरीशभाऊ महाजन यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
कथित पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या गगनभेदी या युट्युब चॅनलवर जलसंपदा मंत्री तथा भाजपचे मातब्बर नेते गिरीशभाऊ महाजन यांच्यावर गंभीर आरोप करणारा व्हिडीओ अपलोड केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यात थत्ते यांनी महाजन यांचे राज्यातील एका महिला आयएएस अधिकार्‍याशी संबंध असल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडल्या होत्या. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी यावरून महाजन यांच्यावर टिका केली होती तर गिरीशभाऊंनी त्यांना प्रत्युत्तर देतांना खडसेंवर गंभीर आरोप केले होते.

बदनामीच्या खटल्याकडे लक्ष
कथित आरोपांमुळे व्यथित झालेले गिरीशभाऊ महाजन हे न्यायालयात गेले होते.त्यांनी अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांना नोटीस दिली होती. यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने अनिल थत्ते यांनी सोशल मीडियातून सदर व्हिडीओ काढून टाकावा, असा आदेश दिला आहे. आता अब्रू नुकसानीच्या खटल्यात पुढे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !