भर रस्त्यात तरुणीची हत्या

Murder of a young woman on the street पुणे (12 मे 2025) : 18 वर्षीय तरुणीची रविवारी रात्री भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तपासात तरुणीची हत्या शेजार्याने केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास अटक करण्यात आली.
कोमल भरत जाधव (वय 18) या तरुणीची रविवारी (11 मे) रात्री हत्या करण्यात आली होती. कोमल जाधव ही पिंपरी चिंचवडला लागून असलेल्या वाल्हेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचे घर आहे.
रविवारी कोमल घरात होती. त्यावेळी बाईकवरून दोन जण आले. त्यांनी तिला घराबाहेर बोलावून घेतले. कोमल घरातून बाहेर आली. ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा जागेवरच मृत्यू झाला.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यात पोलिसांना 24 तासातच यश आले.
कोमल जाधवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणार्या 45 वर्षीय उदयभान यादव (मुख्य आरोपी) आणि त्याचा सख्खा भाचा अशा दोघांना अटक केली. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.
मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. त्याचबरोबर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केली.
