भुसावळातील सेंट अलॉयसीसमधून यशिता गिरीश चौधरी प्रथम

Yashita Girish Chaudhary from St. Aloysius, Bhusawal, first भुसावळ (13 मे 2025) : शहरातील सेंट अलॉयसीस कॉन्व्हेंट हायस्कूलने दहावी परीक्षेतही यशाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यालयातून यशिता गिरीश चौधरी ही विद्यार्थिनी 98.40 टक्के गुण मिळवून प्रथम आली. तिने यशाचे श्रेय तिच्या गुरूजणांसह आई-वडीलांना दिले आहे.
द्वितीय क्रमांक यश सुहास बर्हाटे याने 98 टक्के गुण पटकावून मिळवला तर तृतीय क्रमांक सानिका विवेक नेहते (97.60) व वेदांत मिलिंद बर्हाटे (97.40) यांनी पटकावला.

403 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यातील 244 विद्यार्थ्यांनी डिस्टींगन्शन मिळवले तर 117 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली तर 40 विद्यार्थी द्वितीय श्रेयीतून उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूलच्या प्रिन्सीपल तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
