भुसावळातील एम.आय.तेली इंग्लिश मिडीयम स्कूलचा शंभर टक्के निकाल

100% result of M.I.Teli English Medium School in Bhusawal भुसावळ (13 मे 2025) : शहरातील एम.आय.तेली इंग्लिश मिडीयम स्कूलने दरवर्षाप्रमाणे यंदाही उच्चांकी निकालाची परंपरा यंदाही कायम राखली. मार्च दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. 125 विद्यार्थी विशेष श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.
या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
विद्यालयातून मदीहा फातेमा आरिफ खान (94.40) गुण मिळवून प्रथम तर नीहा नाज फिरोज शेख (93.60) द्वितीय आली. नीहा ही भुसावळातील रहिवासी व प्रहारचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांची कन्या आहे. दरम्यान रूहूमा कशफ रईस खान (92) व फातेमा शाकीफ अहमद शेख (92) तृतीय आल्या. या शिवाय शेख असफिया वसीम (91), सानिया अब्दुल हनीफ ़कुरेशी (90.80), सरीना रहिम पटेल (90) व जिकरा युसुफ पटेल (90) गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
यशवंत विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहीम तेली व संचालक मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक सय्यद वाजीद अली व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करीत गौरव केला.
