भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची निकालाची परंपरा कायम : दहावीचा निकाल 99.40 टक्के


Ahilyadevi Girls’ School continues its tradition of success : Class 10th result 99.40 percent भुसावळ (13 मे 2025) : शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इयत्ता दहावीच्या निकालामध्ये घवघवीत यश मिळवले. शाळेचा एकूण निकाल 99.40 टक्के लागला.

शाळेतील एकूण दहा विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेला शाळेतील 167 विद्यार्थिनी प्रविष्ट होत्या. पैकी 80 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह 68 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, 16 विद्यार्थिनी तृतीय श्रेणीत तर दोन विद्यार्थिनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.

शाळेतून प्रथम पूर्वजा किशोर काळे (97.20), द्वितीय पूर्वा सचिन चौधरी (96.60), तृतीय तनुश्री घनश्याम भोळे (96.00) आली. मागासवर्गीय विद्यार्थिनींमधून प्रथम प्राची प्रवीण वाघ (85.40) आली.

शाळेतील सर्व गुणवंतांचा संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांनी सत्कार करीत शुभेच्छादिल्या. प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्रीधर खणके, अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !