ठाकरे गटाला धक्का : तेजस्वी घोसाळकरांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

Shock to Thackeray group : Tejashwi Ghosalkar says ‘Jai Maharashtra’ to Shiv Sena न्युज डेस्क । मुंबई (13 मे 2025) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईतून मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीतील आघाडीच्या नेत्या, माजी नगरसेविका आणि दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर आता माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिल्याने मुंबईत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

घोसळकर यांनी आपण महिला – दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते, असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
