रावेरात आमदारांकडून तालुका कृषी अधिकारी फैलावर

रावेर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक


रावेर (13 मे 2025) : रावेर मतदारसंघातून आ.अमोल जावळे तर चोपडा विधानसभा मतदारसंघातून आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे हे निवडून यायला 5 महिने झाले. या पाच महिन्यात यावल तालुका कृषी अधिकारी वावरे यांनी दोघंही आमदारांना कृषी संदर्भात कुठलीच माहिती न दिल्याने तसेच संपर्कात न राहिल्याने शेतकर्‍यांच्या विविध योजना आणि समस्या या प्रलंबित राहिल्याने आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी तालुका कृषी अधिकारी वावरे यांना चांगलेच धारेवर धरले.

यावल तहसील कार्यालयात सोमवार, 12 मे 2025 रोजी तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी आयोजित केली होती.

या बैठकीत आ.प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, आ.अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती राहिली.आमदार सोनवणे पुढे म्हणाले की,आम्ही दोघं आमदार निवडून यायला 5 महिने कालावधी उलटला परंतु तालुका कृषी अधिकारी वावरे यांनी समाजाचा,शेतकर्‍यांचा विकास होण्यासाठी कार्यालयीन आणि शासकीय स्तरावरून काय काय समस्या येत आहे याबाबत संपर्क साधला नाही.अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांच्या विकासा संदर्भात चर्चा करणे आवश्यक आहे. आपण फुकट कामकाज करीत नाही शासनाकडून आपल्याला भरपूर पगार मिळतो आणि हा पगार जनता जी टॅक्स देते त्यातून आपला पगार होत असतो.तरी सुद्धा कृषी संदर्भात गेल्या पाच महिन्यात कुठलीच माहिती न दिल्याने कृषी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यावेळी यावल- रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार सोनवणे आमदार जावळे यांनी मातीचे ‘पूजन’ करून केले.कृषी यांत्रिकीकरण योजना,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना,कापूस सोयाबीन व इतर तेलबिया मूल्य साखळी योजना,ठिबक सिंचन योजना तसेच पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक योजनेचा क्षेत्र तपासणीचा प्रगती अहवाल, स्वर्गीय गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सानुगृह अनुदान योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. तसेच आपत्कालीन पीक नियोजनाबाबत निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रणाबाबत, गुण नियंत्रण भरारी पथक व तालुकास्तर नियंत्रण कक्ष, इत्यादी अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.आणि उपस्थित कृषी अधिकार्‍यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. यासोबत तालुक्यात विविध योजनांमधून देण्यात आलेल्या लाभाबाबत अहवाल तपासणी करण्यात आली.तालुका कृषी अधिकार्‍यांनाच जर शेतकर्‍यांच्या विविध योजनांची व शेती विषयक माहिती व जाणीव नसेल,शासकीय कामकाज करण्याची मानसिकता नसेल तर मग शेतकरी जातील कुठे असा प्रश्न आ.अमोल जावळेंचा यांनी उपस्थित करून शेतकर्‍यांच्या विकासा संदर्भात आणि अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेबाबत तीव्र चिंता आणि खंत व्यक्त केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !