तरुणीने ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराकडून नाजूक संबंधाचे व्हिडिओ ‘पॉर्न’ साईटवर टाकण्याची धमकी

Angry over breakup, boyfriend threatens to post intimate sex video on porn site कोल्हापूर (14 मे 2025) : ब्रेकअपनंतर प्रेयसीचे नाजूक संबंधाचे फोटो व व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी देणार्या मूळच्या कोल्हापूरातील प्रियकराविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात काही कारणांमुळे मतभेद झाले आणि तरुणीने ब्रेकअप केले. ब्रेकअपनंतर पीडित तरुणीने आयटी क्षेत्रात नोकरीस सुरुवात केली आणि सध्या ती पुण्यातील एका कंपनीत काम करत आहे.

ब्रेकअपनंतरही आरोपी तरुण तिला सतत फोन आणि मेसेज करून लग्नासाठी तगादा लावत होता. पीडित तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने संतप्त होऊन दोघांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे तिला सतत अश्लील मेसेज आणि कॉल्स करून मानसिक छळ सुरू केला होता. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड विधानातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
