माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांना न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची कोठडी
नवी दिल्ली : सीबीआयने अटक केलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना गुरुवारी सीबीआय न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचलनालयाने त्यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच सीबीआयने न्यायालयाकडे पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.