एक लाख 70 हजारांची लाच मागणी भोवली : ईगतपुरी पालिकेच्या लेखापाल, अभियंत्यासह तिघे जाळ्यात
ईगतपुरीतील लाचखोरांसाठी बुधवार ठरला अशुभवार ः पुरवठा विभागानंतर पालिकेतील कारवाईने लाचखोर हादरले

Three people including Igatpuri Municipality accountant and engineer caught in a bribery case of Rs 1.70 lakh ईगतपुरी (14 मे 2025) : ईगतपुरी तहसीलच्या पुरवठा निरीक्षकासह तिघांना अटक करून 12 तास उलटत नाही तोच ईगतपुरी पालिकेच्या लेखापाल, अभियंत्यासह तिघांना एक लाख 70 हजारांची लाच प्रकरणात अटक करण्यात आल्याने लाचखोर पुरते हादरले आहेत. नाशिक एसीबीच्या धडक कारवाईचा धसका परिक्षेत्रातील लाचखोरांनी चांगलाच घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकार्यांच्या नावानेही लाच मागण्यात आल्याने त्यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत.
यांना झाली अटक
अटकेतील संशयीतांमध्ये सफाई कामगार नितीन दगडू लोखंडे (44), संगणक अभियंता सुरज रवींद्र पाटील (32) व लेखापाल सोमनाथ बोराडे यांचा समावेश आहे.

असे आहे लाच प्रकरण
43 वर्षीय तक्रारदार यांनी केलेल्या इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे, संगणक र प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याचे मोबदल्यात स्वतः करिता तसेच मुख्याधिकारी यांच्याकरीता 27 टक्क्यांप्रमाणे एक लाख 90 हजार झाल्याने एक लाख 70 हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर 25 एप्रिल व 2 मे रोजी पडताळणी करण्यात आली मात्र लाच स्वीकारण्यात आली नसलीतरी लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर बुधवारी संशयीतांना पथकाने अटक करीत त्यांच्याविरोधात ईगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, हवालदार संदीप हांडगे, अंमलदार सुरेश चव्हाण, हवालदार प्रफुल्ल माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
