सोशल मिडीयावरून प्रेम : लग्न करण्याच्या आमिषाने तरुणी येताच अत्याचार करून काढला पळ

Love through social media : With the lure of marriage, the young woman was tortured and fled. नांदेड (14 मे 2025) : पुण्यातील तरुणीची सोशल मिडीयाद्वारे नांदेडच्या तरुणासोबत ओळख होवून दोघे प्रेमात पडले. तरुणाने लग्न करू, असे वचन दिल्यानंतर तरुणी हदगावला आली मात्र तरुणाने तिच्याशी शरीरसंबंध ठेवत नंतर तरुणीला रस्त्यावर सोडून पळ काढला.
फसवणूक झाल्याच्या धक्कयानंतर तरुणीनं तातडीने तामसा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावर आरोपी बाळू पऊळ या तरुणावर लैंगिक अत्याचारासह अॅट्रासिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

बाळू पऊळ या आरोपीची पुण्यातील एका युवतीशी सोशल मीडियावर ओळख झाली. काही दिवसांनंतर ही ओळख प्रेमात बदलली. आरोपीने तिला सतत लग्नाचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून युवती हदगाव तालुक्यातील बन चिंचोली येथे आरोपीला भेटण्यासाठी आली. तेथे आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिला रस्त्यावर सोडून पसार झाला. शेवटी ती तामसा पोलीस ठाण्यात पोहचून तक्रार दाखल केली.
