साईबाबा श्री संस्थानच्या सुधारित देणगी धोरणास मान्यता

Approval of the revised donation policy of Sai Baba Shri Sansthan शिर्डी (14 मे 2025) : साईबाबा श्री संस्थानच्या तदर्थ समितीने सुधारित देणगी धोरणास मान्यता देण्यात आली आहे. मोठ्या देणग्यांकरिता तहहयात व्हीव्हीआयपी दर्शनाबरोबरच वस्त्र अर्पणाच्या संधी देखील मिळतील, असे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर म्हणाले.
श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

10,000 ते 24,999 रुपये: 5 सदस्यांसाठी एक वेळचा आरती पास, 5 उदी प्रसाद पॅकेट्स व 1 लाडू प्रसाद.
25,000 ते 50,000 रुपये: दोन वेळा आरती/दर्शन पास, 3 डी पॉकेट फोटो, 5 उदी, 1 साई चरित्र, 2 लाडू प्रसाद.
50,001 ते 99,999 रुपये: 2 व्हीव्हीआयपी आरती पास, सन्मानचिन्हे, 5 उदी, साई सतचरित्र, 2 लाडू प्रसाद.
1 लाख ते 9.99 लाख रुपये: पहिल्या वर्षी 2 व पुढील वर्षांसाठी प्रत्येकी 1 व्हीव्हीआयपी पास, एक वेळचे वर्षातून मोफत दर्शन, सन्मान शॉल, 3 फोटो, पूजेचे कूपन, भोजन पास, वस्त्र व प्रसाद भेट.
10 लाख ते 50 लाख रुपये: प्रत्येक वर्षी 2 व्हीव्हीआयपी आरती पास, वर्षातून एक वेळ मोफत प्रोटोकॉल दर्शन, साईबाबांना वस्त्र अर्पणाची संधी, वस्त्र भेट, साई मूर्ती, पूजेचे कूपन्स, भोजन पास.
50 लाखांहून अधिक : आयुष्यभर दरवर्षी 3 व्हीव्हीआयपी आरती, दोन प्रोटोकॉल दर्शन पास, वस्त्र अर्पण, साई मूर्ती, सन्मान चिन्हे, भोजन पास
