भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात : आईसह मुलगी ठार

Accident due to loss of control of speeding car: Mother and daughter killed कोल्हापूर (19 मे 2025) : धुळे-सोलापूर महामार्गावर कार अपघातात आईसह तिच्या अडीच वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले.
रोहिणी चव्हाण (32) आणि तिची मुलगी नुरवी चव्हाण (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण कारने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला गेली आणि उलटली.

धुळे-सोलापूर महामार्गावरून कारमधील सर्व प्रवासी सौंदलगाव फाट्याच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार पलटी घेतली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारमधील रोहिणी चव्हाण (वय 32 वर्षे) आणि तिची अडीच वर्षांची मुलगी नुरवी चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली
पोलिसांनाही तत्काळ माहिती देण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तिन्ही प्रवाशांना तत्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वडीगोद्री पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
