आयपीएस अर्चित चांडक अकोल्याचे नूतन पोलिस अधीक्षक : राज्यातील 22 अधिकार्यांच्या बदल्या

IPS Archit Chandak new Superintendent of Police of Akola : 22 officers transferred in the state मुंबई (22 मे 2025) : राज्यातील आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता 22 पोलिस अधीक्षक/पोलिस उपायुक्त पदांवरील अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर शहर पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांची अकोला पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे तर अकोल्याचे अधीक्षक बच्चन सिंह यांची नागपूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चारच्या समादेशकपदी बदली करण्यात आली आहे.
अशा झाल्या बदल्या
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली

सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली.
धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिकार्यांची वर्णी लागली आहे. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.
माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाहीये. स्वतंत्रपणे त्यांचा नियुक्ती देण्यात येणार आहे.
रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या
