महिलासह पुरूषाने नग्न होवून स्मशानभूमीत केली पूजा : काय घडले नेमके !

Man and woman worship naked in graveyard कोल्हापूर (19 जून 2025) : कोल्हापूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरोळ तालुक्यातील उदगावच्या वैकुंठधाममध्येही महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार घडला असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पूजेची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ आणि नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आलं.
या प्रकारानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये एका महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आला.
सीटीटीव्हीत दिसणारा पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम मध्ये आल्याचं दिसून आलं. आमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आले.
