उद्धव ठाकरेंच्या ‘त्या‘ वक्तव्यावर धरणगावात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ; बोलबच्चन भैरवी असलेल्यांना उत्तर देत नाही !


On Uddhav Thackeray’s ‘that’ statement, Chief Minister Fadnavis said in Dharangaon; Bolbachchan does not answer those who are Bhairavi! धरणगाव (20 जून 2025) : उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्यास भाजपचे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवून टाकू, असा इशारा दिला होता. या वक्त्यव्याबाबत जळगाव जिल्हा दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले की, बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही.

क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धरणगाव येथे केले. याप्रसंगी ते बोलत होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
कम ऑन किल मी हिंमत असेल तर अंगावर यापण अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभच्या चित्रपटात तो अ‍ॅम्बुलन्स घेऊन येतो तशी अ‍ॅम्बुलन्स घेऊनच या. कारण तुम्ही पायावर चालत जाणार नाही, तर जाताना आडवे होऊन स्ट्रेचरवर जाल, असा आसूड उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात ओढला होता. ठाकरे यांच्या या टिकेला उत्तर देताना शुक्रवारी धरणगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलबच्चन भैरवी अशी उपाधी दिली. अशांना मी उत्तर देत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धरणगाव येथे केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !