देवेंद्र फडणविसांची भेट झाली नसल्याची खंत नाही : आमदार एकनाथराव खडसे

I have no regrets about not meeting Devendra Fadnavis: MLA Eknathrao Khadse धरणगाव (20 जून 2025) : धरणगाव येथे आयोजित कार्यक्रम हा शासकीय नव्हता तर संघाचा कार्यक्रम होता व केवळ मंत्री व संघ पदाधिकार्यांनाच व्यासपीठावर बसवण्यात आले. मुख्यमंत्र्यांची औपचारीक भेट झाली असती तर आपण भेट घेणार होतो मात्र भेट झाली नसलीतरी त्याची खंत नसल्याचे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले आहेत. दरवेळा मुख्यमंत्री जिल्ह्यात येतात मात्र जिल्ह्यात पदरी काही ठोण पडत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आग्रहपूर्वक कार्यक्रमास बोलावले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी क्रांतीवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या अनावरणाप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील धरणगावात आले होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र भेट होवू शकली नाही.
या संदर्भात आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होती, हे खरं नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. औपचारिकरित्या जर भेट झाली तर भेट घेईल, असा माझा प्रयत्न होता. हा कार्यक्रम शासकीय नव्हता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात राजकीय चर्चा होईल, अशी अपेक्षा नव्हती. मी कार्यक्रमाला उपस्थित होतो व या कार्यक्रमाला मला आग्रहपूर्वक बोलवण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणसांची भेट झाली नसल्याची खंत नाही
आपण व्यासपीठावर न जाता व्हीआयपी कक्षात बसला, याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, सर्वांना व्यासपीठावर स्थान द्यावं, अशी अपेक्षा नव्हती. मोजक्यात लोकांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. व्यासपीठावर फक्त मंत्री आणि संघाचे प्रचारक होते. आमदारांना व्हीआयपी कक्षात बसवण्यात आलं. आम्ही विरोधी पक्षात आहोत. कर्जमुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नाही, याची खंत नाही. त्यांची शांततेत अपॉइंटमेंट घेऊन मी केव्हाही भेट घेऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.
