भुसावळात अद्वैतानंद योगा अॅण्ड फिटनेस स्टुडिओतर्फे भव्य योग महोत्सव

Grand Yoga Festival organized by Advaitananda Yoga and Fitness Studio in Bhusawal भुसावळ (21 जून 2025) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शहरातील अद्वैतानंद योगा अॅण्ड फिटनेस स्टुडिओत भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत योग साधकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण मंदिराच्या संचालक व व्यवस्थापक वैशाली आराध्य, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.आरती चौधरी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक राजेंद्र राणे आदींची उपस्थिती होती.
देवेंद्र पाटील व इंटरनॅशनल योगा एकसपर्ट व थेरपिस्ट प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील यांनी योग व ध्यानाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बेस्ट परफॉर्मन्स इन योगा पुरस्कारांनी छाया दीक्षित, विद्या शिंपी, ज्योत्स्ना चौधरी, मनस्वी कुलकर्णी, सोना सिंग, कुसुम सुरवाडे, स्मिता बारजिभे, जयश्री राणे आदींना गौरवण्यात आले.
शंखनाद बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कार ज्योती कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
बाल योगिनी या विशेष गौरवाने गार्गी आणि गार्वी नेहेते यांना सन्मानित करण्यात आले.
