भुसावळातील एम.आय.तेली स्कूलचा दिल्लीत डंका : नूर फातेमा मणियारचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
भुसावळात वस्त्रोद्योग मंत्र्यांची गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

M.I.Teli School in Bhusawal was attacked in Delhi: Noor Fatema Maniyar was honored by the President भुसावळ (21 जून 2025) : भुसावळातील एम.आय.तेली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत नावलौकीक मिळवला आहे. 15 जून रोजी 2023 रोजी टाटा बिल्डिंग इंडिया ग्रुपतर्फे राष्ट्रीय स्तरावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली होती व या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी नूर फातेमा शकील मनियारने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवल्याने तिचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याहस्ते दिल्लीत सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत सुमारे 500 विद्यार्थी सहभागी झाले.
13 भाषेत निबंध लेखन स्पर्धा
2023 मध्ये टाटा बिल्डिंग इंडिया ग्रुपतर्फे राष्ट्रीय स्तरावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली व त्यात देशभरातील शाळेतील 500 वर विद्यार्थी सहभागी झाले. भारतातील एकूण भाषांपैकी 13 भाषांमध्ये झालेल्या या स्पर्धेत भुसावळच्या एम.आय.तेली इंग्लिश स्कूलची त्यावेळी सहावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी नूर फातेमा शकील मणियारने प्रथम क्रमांक पटकावला. ‘टाकाऊ वस्तूंपासून पुर्नवापर करून उपयुक्त वस्तू तयार करणे’ असा स्पर्धेचा विषय होता. स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर राष्ट्रपती भवनात दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्याहते मेडल, प्रमाणपत्र समानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यापूर्वी दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
भुसावळातील एम.आय.तेली इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनीला 2013 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याहस्ते तसेच 2014 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते बाल वैज्ञानिकाचा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आहे.
गुणगौरव प्राप्त विद्यार्थिनीचा शाळेतर्फे सन्मान
शनिवार, 21 रोजी राष्ट्रपतीच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या नूर फातेमा शकील मणियार या विद्यार्थिनीचा तसेच एस.एस.सी. 2025 मध्ये प्रथम आलेल्या मदिहा आरीफ खान (94.40), द्वितीय आलेल्या निहा नाज फिरोज शेख (93.60), तृतीय आलेल्या रुहामा कशफ राईस खान (92.20) यांच्याहस्ते त्यांचा पालकांचा मॉडर्न एज्युकेशन सोसायटीद्वारा सत्कार करण्यात आला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
प्रसंगी व्यासपीठावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगावच्या अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष एजाज मलिक, जळगावच्या पिंच सोडा संचालक जाफर भाई, एम.आय.तेली स्कूलचे संस्थाध्यक्ष हाजी मुन्ना तेली, सदस्य अख्तर पिंजारी, जलील कुरेशी, माजी नगरसेवक साबीर शेख, हाजी रहिमोद्दिन शेख, हुस्नोदीन शेख, हाजी अय्युब शेख, सुलेमान तडवी, आसीफ तेली, आशिक तेली, इम्तियाज शेख, शकील रोशन मणियार, आरीफ खान, फिरोज शेख, राईस खान, मुख्याध्यापक सैय्य्द वाजीद अली आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
