आमदार एकनाथराव खडसेंची खोचक टीका : पूर्वीच्या गुन्हेगारीमुक्त भाजपाने आता सलीम कुत्तासोबत नाचणार्‍या सुधाकर बडगुजरलाही घेतले !


MLA Eknathrao Khadse’s scathing criticism: The previously crime-free BJP has now also taken on Sudhakar Badgujar, who danced with Salim Kutta! पंढरपूर (22 जून 2025) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे खडसे यांनी भाजपावर पुन्हा जोरदार टीका केली आहे. पूर्वी भाजपा भ्रष्टाचार व गुन्हेगारीमुक्त होती मात्र आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात असल्याचे ते म्हणाले. खडसे म्हणाले की, अगदी दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत नाचणार्‍या सुधाकर बडगुजरला देखील भाजपमध्ये घेण्यात आले हे अति झाल्याचे ते पंढरपूरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

काय म्हणाले नाथाभाऊ ?
आमदार खडसे म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांचा 1993 च्या मुंबई ब्लास्टमधील आरोपी सलीम कुत्तासोबतचे फोटो भाजप नेते नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी समोर आणले होते तसेच तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची देखील घोषणा केली होती परंतु तेच बडगुजर आता भाजपमध्ये गेल्याचे त्यांनी म्हणत पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील असल्याचे म्हटले.

अजित पवारांचे नाव न घेता टीका
ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती, ते आज पक्षात आहेत. 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेही आज यांच्यासोबत आहेत, असा देखील टोला एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे. भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला असून मी अंधारात असताना मला साथ देणार्‍या शरद पवार यांच्यासोबतच मी असणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांना मात्र क्लीन चीट
भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहेत का असे विचारले असता खडसेंनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चीट देत यासाठी त्यांना एकट्याला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले. प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार आहेत. मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता, मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर तो कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असेही खडसे म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !