माजी अर्थमंत्री अरुण जेटलींचे अखेर निधन


नवी दिल्ली : नोटबंदी व जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली (66) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानक 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली 28 डिसेंबर 1952 मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली. त्यांनी 26 मे 2014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय 13मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. या शिवाय 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते राहिले.


कॉपी करू नका.