भुसावळातील पिंटू कोठारींच्या दातृत्वाचे कोठार ‘कोरोनात’ही खुले


भुसावळ : माणसाची खरी पारख संकटात होते…एरव्ही मदतीचा हात देणारे संकटात साथ सोडतात… मात्र काही माणसं मात्र आपल्यातील दातृत्व भावना सदैव जपत सर्वांसाठी काळ, वेळप्रसंगी धावुन जातात… संकटातही ते पाठ न दाखवता पाठराखण करतात… माणुसकी धर्म जोपासत आपल्यातील देव माणसाची प्रचिती देतात. त्यातीलच एक भुसावळातील कर्तृत्ववान नगरसेवक पिंटूभाऊ कोठारी…. कोरोनासारख्या गंभीर संकटात ते सर्वांसाठी पायाला भिंगरी लावल्यागत धावून जात अडल्या-नडल्यांना मदतीचा हात देत आहेत त्यामुळेच अडचणीच्या क्षणी डोळ्यासमोर आपला माणूस म्हणून पिंटूभाऊ कोठारी हे येतात. कोरोनासारख्या महामारीत या दातृत्व योद्ध्याला ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा सलाम !

दातृत्वाचा धनी : पिंटूभाऊ कोठारी
कोठारींच्या कार्याची महती सांगायची म्हटल्यास त्यास शब्दच नाहीत. भुसावळात अपघात असो वा आग हमखासपणे जीव धोक्यात घालून संकटात अडकलेल्यांना हात देण्यात नेहमीच पिंटूभाऊ कोठारी हे अग्रेसर ठरले आहेत नव्हे तर भुसावळकरांनी ते अनुभवलेदेखील आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मदतीचा कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी प्रभागातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत निर्जंतुकीकरण तर केलेच मात्र ज्यांचे हातावर पोट आहे मात्र रोजगार नसल्याने ज्यांच्या जेवणाची भ्रांत आहे अशांना घरपोच जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपदेखील केले. एव्हढ्यावर थांबतील ते कोठारी कसले…! लॉकडाऊनमुळे बस/रेल्वे सेवा ठप्प झाल्यानंतर लोंढ्याचे लोंढे मजल-दरमजल करीत गावाकडे ऊन वारा व जीवाची पर्वा न करता निघाल्याने कोठारींनी या लोकांसाठी महामार्गावरच अन्नछत्र सुरू करून प्रवाशांच्या पोटाची भूक भागवली तर रणरणत्या उन्हाचे चटके सोसणार्‍या प्रवाशांना पदरमोड करीत खाजगी वाहनातून काही अंतरापर्यंत स्वखर्चातून सोडण्याची व्यवस्थादेखील केली. कोरोनाच्या महामारीत घरोघरी जावून नागरीकांचा आरोग्य सर्वे करणार्‍या आशा वर्करांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना पाठीराखा भाऊ म्हणून आधारही दिला. भुसावळात कोरोनाचे संकट अधिक गडत होत असताना प्रभागातील नागरीकांची थर्मोमीटरने आरोग्य तपासणी तर केलीच शिवाय संचारबंदीमुळे नागरीकांना घराबाहेर पडणे कठीण ठरत असताना रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आधार देत त्यांच्या जेवणाची व्यवस्थादेखील कोठारींनी साई सेवा समितीच्या माध्यमातून चोखपणे बजावली.




नगरसेवक नव्हे ते तर देवदूतच…!
कोठारींच्या दातृत्वाला अंतच नाही. भुसावळ नगरपालिका दवाखान्यात येणार्‍या नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांनी स्वखर्चाने दोन थर्मोमीटर दिले. पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.संदीप जैन, डॉ.पांढरे यांच्याकडे ते नुकतेच सुपूर्द करण्यात आले शिवाय चैतन्य आयुर्वेदिक हॉस्पिटल क्वारंटाईन सेंटर येथेदेखील एक थर्मोमीटर देण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एक महिला आपल्या तान्हुल्याला घेवून पळत असताना कोठारींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आस्थेवाईक विचारपूस केल्यानंतर त्यांना मुलगा जखमी झाल्याचे कळाल्यानंतर त्यांनी स्वतः त्या महिलेसह चिमुकल्यास डॉ.किरण झांबरे यांच्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यासाठी तातडीची मदत केली. या मदतीनंतर त्या माय-माऊलीच्या तोंडातून कोठारींना मिळालेल्या त्या आशीर्वादांना शब्दच नाहीत… सुखात तर सर्वच सोबत असतात मात्र कठीण प्रसंगी कुठलाही बडेजावपणा न करता सेवा करतो तोच खरा ‘सेवाव्रती’…!

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !