सातारा हिल मॅरेथॉनमध्ये धावले ‘भुसावळकर धावपटू’


भुसावळ : भुसावळातील धावपटूंनी ऐतिहासिक सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत आव्हानात्मक 21 किलोमीटरचे अंतर लिलया पार केले. 25 ऑगस्ट रोजी सातार्‍यात ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा’ झाली. या स्पर्धेत भुसावल स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर असोसिएशनचे प्रवीण फालक, प्रवीण पाटील, ब्रिजेश लाहोटी, तरुण बिरीया, प्रदीप सोलंकी यांनी सहभाग नोंदवत 21 किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर सहज पार केले. या स्पर्धेत सात हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत आंतरराट्रीय धावपटूदेखील सहभागी झाले. समुद्र सपाटीपासून तीन हजार 473 फूट उंचीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये ही मॅरेथॉन भरवण्यात आली. सहभागी धावपटूंना डॉ.तुषार पाटील, संजीव भटकर व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.


कॉपी करू नका.