यावलला पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागेसाठी पोटनिवडणूक : आठ अर्ज दाखल

दोन ग्रामपंचायतीत एकही अर्ज नाही : पाडळसातील जागा बिनविरोध शक्य


Bypolls for Six Seats Across Five Gram Panchayats in Yawal: Eight Nominations Filed यावल (14 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या विविध कारणे रिक्त असलेल्या सहा जागेवर पोटनिवडणूक जाहिर झाली आहे. सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी न्हावी, पाडळसा व चिखली खुर्द या ग्रामपंचायतीतून आठ अर्ज प्राप्त झाले. त्यात पाडळसा येथील जागा बिनविरोध होणे जवळपास निश्चित झाले तर दोन ग्रामपंचायतीत एक ही अर्ज प्राप्त झालेला नाही तर आता 15 एप्रिल रोजी छाननी होणार आहे.

सहा जागांसाठभ निवडणूक
यावल तालुक्यातील विविध कारणांनी रिक्त असलेल्या पाच ग्रामपंचायतीतील 6 जागे करीता मंगळवारपासून निवडणूक कार्यक्रम सुरू झाला होता. यात सोमवार, 13 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाडळसा येथील वॉर्ड क्रमांक एक मधील अनुसूचित जातीच्या एका जागेकरीता कविता प्रशांत तायडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला व ही जागा ही बिनविरोध होणे शक्य झाले आहे. छाननीनंतर या जागेसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृतरित्या घोषण करतील, असे अपेक्षीत आहे.


त्याच प्रमाणे न्हावीतील वॉर्ड क्रमांक 5 मधील अनुसूचित जमातीच्या एक व न्हावी येथीलच वार्ड क्रमांक 3 मधील नामाप्रची एक जागा या करीता 5 अर्ज प्राप्त झाले आहे. तर चिखली खुर्द येथील वार्ड क्रमांक 1 मधील सर्वसाधारण जागे करीता 2 अर्ज प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण 8 अर्ज प्राप्त झाले आहे तर पिळोदे बुद्रुक येथील वार्ड क्रमांक 1 मधील अनुसूचित जमाती स्त्री ची जागा व गिरडगाव येथील वार्ड क्रमांक 3 मधील अनुसूचित जमातीच्या स्त्री च्या एका जागे करीता कुणीचं अर्ज दाखल केला नाही व या जागा पुन्हा रिक्त राहिल्या आहे. अर्ज स्विकारण्याचे काम निवासी नायब तहसीलदार बी.के.पवार यांच्या उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडळाधिकारी जी.एन शेलकर,सलमान तडवी, रशीद तडवी यांनी पाहिले.

पुढील कार्यक्रम असा
बुधवार, 15 एप्रिल रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी

शुक्रवार, 7 ए्रपिल दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीस मुदत व त्या नंतर चिन्ह वाटप

मंगळवार, 28 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळ 5 या वेळेत मतदान

बुधवार, 29 एप्रिल रोजी यावल तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेला मतमोजणी.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !