तामिळनाडूतील फटाका कारखान्यात स्फोट : 16 जणांचा मृत्यू


Explosion at Firecracker Factory in Tamil Nadu: 16 Dead विरुधुनगर, तमिळनाडू (19 एप्रिल 2026) : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्यानंतर या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू ओढवला तर सहा जण या अपघातात गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर नजीकच्या इमारतींनाही तडे गेले.

अनेक जण ढिगार्‍याखाली ?
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात रविवारी एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 16 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. 6 गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर अनेकजण ढिगार्‍याखाली दबले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


स्फोट इतका जोरदार होता की, कारखान्याच्या आसपासच्या इमारतींनाही तडे गेल्याची माहिती आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. सध्या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मुख्यमंत्री स्टालिन यांनी शोक व्यक्त केला
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी द एक्सवर लिहिले की, या दुर्घटनेत अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या सखोल संवेदना व्यक्त करतो.

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना तत्काळ घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच त्यांनी जिल्हाधिकार्‍यांशी बोलून सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे आणि समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !